पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti

QR code - scan this to listen

पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti

A fiction and kids & family podcast in Marathi from Sutradhar
Website: https://bingepods.com

आजपासून साधारण दोन हजार वर्षांपूर्वी भारताच्या दक्षिणेला महिलारोप्य नावाचं नगर होतं. जिथे अमरशक्ती नावाचा राजा राज्य करत होता. अमरशक्तीला तीन मुलं होते. बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती. राजा अमरशक्ती नीतीशास्त्रात जितका निपुण होता तेवढेच त्याचे पुत्र महामूर्ख होते. लेखन-वाचनात त्यांचं मन अजिबात रमत नसे. आणि याची अमरशक्ती राजाला खूपच चिंता होती. एके दिवशी त्याने हीच चिंता आपल्या समस्त मंत्रीमंडळासमोर मंडळी आणि त्यांच्याकडे या विषयी सल्ला मागितला. राजा आपल्या मंत्र्यांना म्हणाला, “माझे पुत्र अजिबातच लेखन-वाचनात लक्ष देत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना शास्त्रांचं जराही ज्ञान नाहीये. यांना असं पाहिल्यावर मला त्यांच्याबरोबर आपल्या राज्याचीही चिंता लागून राहिली आहे. तुम्ही लोक कृपा करून या समस्येवर काही उपाय सांग.”

सभेत उपस्थित एक मंत्री म्हणाला, “राजा! पहिल्या बारा वर्षांपर्यंत व्याकरण शिकायचं असतं. त्या नंतर मनूच्या धर्मशास्त्राचा, चाणक्यच्या अर्थशास्त्राचा आणि नंतर वात्सायनच्या कामशास्त्राचा अभ्यास केला जातो. त्यानंतर ज्ञान प्राप्ती होते.” मंत्र्याचं म्हणणं ऐकून राजा म्हणाला, “मानवाचं जीवन खूपच अनिश्चित आहे आणि अशा प्रकारे सगळी शस्त्र अभ्यासण्यात, वर्ष निघून जातील. हे सारं ज्ञान प्राप्त करण्याचा काही दुसरा उपाय सांगा.” तेव्हा सभेत उपस्थित सुमित नावाचा मंत्री म्हणाला, “इथे समस्त शास्त्रांतील विद्वान आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असलेले विष्णुशर्मा नावाचे आचार्य राहतात. तुम्ही तुमचे पुत्र त्यांच्या ताब्यात द्या. ते अवश्य तुमच्या पुत्रांना कमी कलावधीत समस्त शास्त्रांचं ज्ञान प्रदान करतील.”

सुमतीचं हे बोलणं ऐकून राजाने त्वरित विष्णुशर्माला आपल्या सभेत बोलावलं आणि सांगितलं, “आचार्य! तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या या पुत्रांना लवकरात लवकर नीतीशास्त्राचं ज्ञान प्रदान करा. जर तुम्ही असं केलं, तर मी तुम्हाला शंभर गावं पुरस्कार म्हणून भेट देईन.” राजाचं बोलणं ऐकून विष्णुशर्मा म्हणाले, “राजन माझ्यासारख्या ब्राह्मणाला शंभर गावांचा काय लोभ, मला तुमचा पुरस्कार नको. मी तुमच्या पुत्रांना जरूर ज्ञान प्रदान करेन आणि पुढील सहा महिन्यांत त्यांना नीती शास्त्रात निपुण बनवेन. जर मी असं करू शकलो नाही, तर तुम्ही मला जरूर दंडित करू शकता.” विष्णुशर्माची ही प्रतिज्ञा ऐकून समस्त मंत्रीगण आणि राजा खूप खुश झाला आणि तिन्ही राजपुत्रांना त्यांच्या स्वाधीन करून निश्चिंत होऊन राज्य कारभारत व्यग्र झाला.

विष्णुशर्मा तिन्ही राजकुमारांना आपल्या आश्रमात घेऊन आला आणि पशूपक्षांच्या काहण्यांद्वारे त्यांना शिक्षण देऊ लागला. विष्णुशर्माने या कहाण्यांना पाच भागात विभागलं ते अशा असे, पहिला भाग मित्रभेद : अर्थात मित्रांमधील वाद भांडणे, एकमेकांपसून लांब जाणे, दुसारा भाग मित्रसंप्राप्ती म्हणजे मित्र प्राप्ती आणि त्याचे लाभ, तिसरा भाग काकोलूकीया म्हणजे कावळा आणि घुबडाच्या कथा. चौथाभाग लब्धप्रणाश म्हणजे जिवावर बेतलं, तर काय करायचं आणि पाचवा भाग अपरीक्षितकारक अर्थात ज्या विषयातली माहिती नसले घाईगडबडीने त्यातपावले उचलू नयेत. याच नैतिक काहाण्यांद्वारे विष्णुशर्माने तिन्ही राजकुमारांना सहा महिन्यातच नीतीशास्त्रात विद्वान बनवलं.

मनोविज्ञान, व्यावहारिक दृष्टीकोण आणि राज्यकारभाराची शिकवण देणार्‍य काहण्यांच्या संकलनाला पंचतंत्र म्हटलं जातं आणि याच कहाण्याच्या माध्यमातून मुलांना रंजक पद्धतीने ज्ञानाच्या गोष्टी शिकवल्या जाऊ शकतात. सूत्रधारच्या या पर्वात आम्ही मुलांना विचारात घेत पंचतंत्राच्या या कहाण्या सादर करत आहोत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.sutradhar

Copyright details · more infoArtwork and data is from the podcast’s open RSS feed; we link directly to audio · Read our DMCA procedure
APPLE PODCASTS
Bingepods - Bonus episodes, specials and early access.
Subscribe
Megaphone
Hosted on Megaphone and measured by Nielsen
This podcast may use tracking and attribution and dynamic content insertion

Stats: Statistics are produced by Megaphone to help पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti to understand how many downloads it is getting, or how many people are listening. Your device’s IP address and user agent is used to help calculate this figure. Megaphone is IAB v2 certified. Here is more detail about podcast statistics.

Tracking and attribution: Megaphone and Nielsen or their partners may connect the fact you listened to this podcast to an action elsewhere on the internet. For example - they may spot a device that downloaded an episode of पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti later visited the website of an advertiser; or they may track that a device that listened to पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti also listened to a different show. This form of attribution is used to measure advertising effectiveness.

Dynamic content insertion: Megaphone may use limited data that they know about you - the device you’re using, the approximate location you’re in, or other data that can be derived from this, like the current weather forecast for your area - to change parts of the audio. पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti may do this for advertising or for other forms of content, like news stories.

पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti is able to use the above tools since its podcast host or measurement company offers this service. It doesn’t mean that this individual podcast uses them, or has access to this functionality. We use open data.

Listen and follow

Trailer:
All episodes

Information for podcasters

Privacy: The player will download audio directly from Megaphone if you listen. That shares data (like your IP address or details of your device) with them.
Affiliate links: This page links to Apple Podcasts. We may receive a commission for purchases made via those links.
Cache: This podcast page made . Scheduled for update on . Rebuild this page now

close

Rebuild this page

Some parts of this page are cached. You can get the latest detail and links by solving the simple maths question below.

Get a global view on podcasting and on-demand with our daily news briefing